Posts

Showing posts from March, 2017

शिवनेरी ..... माझ्या नजरेतून

Image
       महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि राजमाता जिजाऊ यांच्या संस्कार नि धन्य झालेला गिरीदुर्ग म्हणजेच शिवनेरी. गडावरील देवी शिवाईच्या नावातून साकार झालेलं नाव आज तमाम हिंदुस्थानी लोकांच्या हृदयावर राज्य करतंय ते म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. अश्या या शिवनेरीच्या मातीचा मस्तकी टिळा लावायला मिळतो हि एक भाग्यपूर्ण गोष्ट...           छत्रपती ग्रुप तर्फे काढलेली पहिलीच मोहीम 'शिवनेरी मोहीम २०१७' भाग्यशाली इतिहासाच्या पाऊलखुणा जाणून घेण्याची एक सुवर्णसंधीच! मोहिमेला विविध ठिकाणाहून वरिष्ठ, विचारवंत, शिवभक्त, इतिहासकार याचेंबरोबर रविवार सुट्टीच्या दिवशी सुरवात झाली. आमची सुरवात पुणे येथून  सकाळी ७:३० वाजता सूर्यदेव दर्शनाच्या प्रथम भगव्या किरणाबरोबर झाली. संत ज्ञानोबामाउलींच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या भक्तिमध्ये न्हाऊन गेलेल्या आळंदी, देहू मार्गे आम्ही चाकण हुन थेट नारायणगाव मध्ये पोहचलो. नारायणगाव मध्ये पोहचल्यावर शिवनेरी गड जवळच असल्याची चाहूल...