Posts

Showing posts from March, 2023

विराटनगरीचे अनमोल रत्न : किल्ले वैराटगड

Image
              आमच्या गावातून सकाळच्या वेळी सूर्य डोक्यावर घेणारा वैराटगड नेहमी लक्ष खेचून घेत होता. पुण्या मुंबईला जाताना त्सरताळे गावात येताच वैराटगड त्याचे ते विशाल बाहू पसरवून बोलावू लागतो. लहानपणी इतिहासाशी अनभिज्ञ असल्याने वैराटगडावर जाऊन सुद्धा त्याचा पूर्ण परिचय झाल्यासारखं वाटत नव्हते. सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान च्या माध्यमातून पुन्हा एकदा वैराटगड चे दर्शन मिळण्याचा योग जुळला!             गडकोट मोहिमांमधून प्रतिष्ठान तर्फे रविवार ३० एप्रिल २०२३ ही तारीख वैराटगड मोहिमेसाठी फिक्स करण्यात आली. आणि शेवटी तो दिवस उजडलाच! आमचे बंधू प्रशांत दादा, राहुल दादा, मार्गदर्शक आणि कोणत्याही मोहिमेस नाही न म्हणणारे देविदास दादा आणि त्यांचा परिवार, सदैव साथ देणारे जालिंदर दादा आणि माजी बहीण गौरी असे १० १२ सरनौबत गोळे आम्ही हर हर महादेव बोलत गडाकडे सकाळी सकाळी प्रस्थान केले. इतिहास               शिलाहार राजा भोजने हा गड ११७८ ते ९३ या काळात बांधला. प्राचीन वैराट ऊर्फ विराटनगरी म्हणजेच आजच्य...