वाईचा पाठीराखा: पांडवगड
वाईच्या वायव्येस (वाई ता. १७' ५५' उ., ७३' ५०" पू. उंची १,२७३ मीटर) ६ कि. मी. अंतरावर वर आपल्या बलाढ्य नैसर्गिक रचनेने लक्ष वेधून घेतो तो विराटनगरीचा पाठीराखा पांडवगड ! चौरस माथा असलेला या गडाच्या सौन्दर्यावर मोहून इकडे पावले ओढ घेत असतात. या गडाला पांडुगड असेही बोलले जाते. इतिहास कोल्हापूरचे शिलाहार राजा दुसरा भोज याने सातारा जिल्यात जे काही दुर्ग निर्माण केले त्यापैकी पांडवगड हा एक! याची निर्मिती ११७८ ते ११९३ या कालखंडात केली असावी. [सातारा गॅझेटिअर, १८८५, पृ. ५३५.] स्थानिक लोकांच्या मते पांडव अज्ञातवासात असताना इथे राहिले होते आणि त्यावरूनच याचे नाव पांडवगड पडले. परंतु याला इतिहास-संशोधकांची मान्यता नाही, कारण पांडव या भागात आलेलेच नव्हते. 'वाई ही महाभारत काळात विराटनगरी होती व पांडव अज्ञातवासात इथे पांडवगडावर राहिले' समजूतीला इतिहास तज्ञांना कोणताही पुरावा मिळालेला नाही. सन १६४८ मध्ये हा वाईच्या विजापूर दरबारच्या मोकासदाराच्या ताब्यात होता. १२ ऑक्टोबर १६७३ रोजी व पांडवगड किल्ल्यावर मराठा फौजेने हल्ला चढवला. आणि १३ ऑक्टोबर रोजी मराठ्यांनी पांडवगड जिंकला य...