उद्याच काय...??

           उद्या दि १५ एप्रिल २०१७ वार शनिवार...उद्या "दुनियभरातील मीडियाला खूप मोठी बातमी भेटेल...!" बातम्या तर खूप साऱ्या भेटत असतील, पण त्या बातमी चा सुतोवाच जर सनकी तानाशहा किंग जोंग ऊन च्या उत्तरी कोरियन अधिकृत बातमी वाहिनीने केला असेल तर दुनियेच्या भल्या भल्या महासत्तांच्या काळजात धडकी भरणारच!
        कारणही तसच आहे हा, हा अन्नाला मुकार झालेल्या जनतेवर अन्यायकारक निर्बंध घालणारा सनकी काय करेल ते सांगता येत नाही. आठवण ६एप्रिल२०१६ ची येतेय. जागतिक पातळीवर देशांची मीटिंग चालली होती. आणि दक्षिण कोरियाने ५.३ रिस्टर स्केल भूकंपाचे हादरे जाणवले. ते हादरे नैसर्गिक नव्हते ते होते कुरत्रिमं आणि त्याचे केंद्र होते उत्तर कोरियात..! ते हादरे होते सनकी हुकूमशाही राजवटीच्या 5 व्या सफलता पूर्ण अनुचाचणीचे..!
           खर तर उत्तर कोरियाने झहीर केलं कि, ती हायड्रोजन बॉम्ब(H bomb) चाचणी होती. शक्यता नाकारू तर शकतच नाही कारण कि भूकंपचे हादरेच सर्व काही सांगून जातात...!
         H BOMB म्हणजे अणुबॉम्बच पण हायड्रोजन च्या केंद्रातून एक अणु काढून त्याचा हेलियम बनवणे. आणि यासाठी लागते ती ५,००,०००℃ एवढी उष्णता. हि उष्णता म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागाएवढी उष्णता! आणि हि जर उष्णता मिळवायची असेल तर प्रथम युरेनियम युक्त अणुबॉम्ब चा पहिला धमाका करा आणि त्या उष्णतेने १०००पट मोठा धमाका मिळवा. म्हणजेच जस आपण सुतूळी बॉम्ब फोडायला अगरबत्तीच विस्तू लावतो..तसच!!!
    आणि काही दिवसापूर्वी आलेल्या वरील बातमी ची सत्य बाजू हि तर नसावी?? तस झालं तर हा सनकी तानाशहा ६ वि अणुचाचणी घेईल..आणि ती जर h bomb ची असेल तर??? आता पर्यंत चीन, रस, usa, फ्रान्स आणि कदाचित उत्तर कोरिया यांनीच हि चाचणी घेतलीय. परंतु h bomb चे आक्राळ विक्राळ दुनियेचे अस्तित्व मिटवू पाहणार भयानक रूप पाहता वरिष्ठ शास्त्रज्ञांना ह्या पोकळ बाजारगप्प वाटताहेत...!
            पण हे जर सत्य असेल तर? आणि ते उत्तर कोरिया सारख्या युद्धाची खुमखुमी असलेल्या राष्ट्राने बनवले तर??? आणि ते चुकून नरसंहारक ताकदीना मिळालं तर?? जगाचा अंत समीपच अस म्हणायला पण हरकत नसावी...कारण माकडाच्या हातात कोलीत मिळलीगतच होईल...!!
उद्याच्या घडामोडी....!!

       खर तर उद्या सॅन फेस्टिवल आहे. आणि तो कोरियन राष्ट्रात मोठ्या प्रमाणत साजरा होतो. पण हि नक्कीच ती बातमी होऊ शकत नाही.
         तसच  काही दिवसापूर्वी डोनाल्ड ट्रम्प तात्यांनी विमानवाहू न्यूक्लीअस युद्धनौका आस्रोलिया ला पाठवतो म्हणून ती दक्षिण कोरियकडे रवाण केली!
          तसच दक्षिण कोरियाचा संयुक्त समुद्री उद्धाभ्यास usa सोबत उद्याच आहे.
            तसच जपणनेही अमेरिकेच्या उद्धनौके सोबत काही आपल्या युद्धनौका हि रवाना केल्यात.

         Usa ने कालच अफगाण मध्ये केलेल्या maob चा हल्ला. कोरियन समुद्रत रवाणा केलेली  युद्धनौका आणि जपानचे तिला पाठबळ...मग तानाशहाने केलेल्या बातमीचे नक्की सूतोवाच तरी काय समजायचे..??? हि युद्धसंघर्षाची सुरवात तर नसावी? WW3 चे संकेत तर नसावेत?? का खरोखरीच  h bomb सारख्या अण्वस्त्रचा भयानक उदय तर नसावा??? का खरच सन फेस्टिवल??? असो, काही जर असलं तरी एक निश्चित आहे 'आशिया धकाधकतोय'......!!! आणि खर काय ते हि उद्याच उमगणार..????
© गणेश आनंदराव गोळे


Comments

Popular posts from this blog

किल्ले अजिंक्यतारा :- द्वारशिल्पे

अब्राहम लिंकन: फाळणी टाळणारा महापुरुष

शिवनेरी ..... माझ्या नजरेतून