Posts

Showing posts from May, 2017

प्रतापगड दुर्ग संवर्धन

Image
दुर्ग संवर्धन            छावा प्रतिष्ठान जावली सोशिअल मीडिया समूहा तर्फे आम्ही 'प्रतापगड मोहीम एप्रिल २०१७', 'दुर्ग संवर्धन आणि स्वच्छता मोहीम' राबवली. आणि या वेळेस तेथे आम्हाला दुर्ग संवर्धनाचा एक भाग्यशाली मोका मिळालाच!               छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांच्या साथीने गनिमी काव्याचा वापर करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. गनिमी कावा म्हणजेच  संख्यबळाने कमी असलेल्या सैन्याच्या साथीने, तुलनेत मोठ्या असणाऱ्या गणिमास जेरीस आणने आणि त्याचा पराभव करणे. यात मुख्य डावपेच बेसावध शत्रूवर अचानक हल्ला करून त्याची जास्तीत जास्त हानी करून, शत्रू सावध होण्यापूर्वी माघार घेणे. असे अगणित हल्ले करून शत्रूचे मनोबल खच्ची करणे आणि त्यांच्या शस्त्रांचे  नुकसान आणि ताबा मिळवणे. त्याचबरोबर उंच आणि दुर्गम डोंगररांगाच्या सानिध्यात उंचावरती क दुर्ग बांधून चालून येणाऱ्या शत्रूवर दाट झाडांच्या सानिध्यातून हल्ले करणे, दगडफेक करणे. यासाठी महाराजांनी  महाराष्ट्रातील ...