प्रतापगड दुर्ग संवर्धन

दुर्ग संवर्धन
           छावा प्रतिष्ठान जावली सोशिअल मीडिया समूहा तर्फे आम्ही 'प्रतापगड मोहीम एप्रिल २०१७', 'दुर्ग संवर्धन आणि स्वच्छता मोहीम' राबवली. आणि या वेळेस तेथे आम्हाला दुर्ग संवर्धनाचा एक भाग्यशाली मोका मिळालाच!
              छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांच्या साथीने गनिमी काव्याचा वापर करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले.गनिमी कावा म्हणजेच  संख्यबळाने कमी असलेल्या सैन्याच्या साथीने, तुलनेत मोठ्या असणाऱ्या गणिमास जेरीस आणने आणि त्याचा पराभव करणे. यात मुख्य डावपेच बेसावध शत्रूवर अचानक हल्ला करून त्याची जास्तीत जास्त हानी करून, शत्रू सावध होण्यापूर्वी माघार घेणे. असे अगणित हल्ले करून शत्रूचे मनोबल खच्ची करणे आणि त्यांच्या शस्त्रांचे  नुकसान आणि ताबा मिळवणे. त्याचबरोबर उंच आणि दुर्गम डोंगररांगाच्या सानिध्यात उंचावरती क दुर्ग बांधून चालून येणाऱ्या शत्रूवर दाट झाडांच्या सानिध्यातून हल्ले करणे, दगडफेक करणे. यासाठी महाराजांनी  महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगांचा प्रभावी वापर केला.याच डोंगररांगमधील जावली खोऱ्यातील भोरप्या डोंगरावर किल्ला बांधला आणि त्याच्या सानिध्यात हिंदू धर्माच्या मंदिरे भुईसपाट करत, धर्म बाटवत आणि गोरगरिबांवर अन्याय करत चालून येणाऱ्या अफजल खानाचा कोथळा येथेच काढला. महाराजांनी केलेल्या पराक्रमाची, प्रतापाची  आठवण करून देणाऱ्या प्रतापगड ही असाच गनिमी कावा युद्धणीतीसाठी परिपूर्ण होता.
       प्रतापगडावर गनिमी काव्याच्या उद्देशाने महाराजांनी बालेकिल्ल्यावर एक चोर दरवाजा काढला होता. हा दरवाजा भुयारी दरवाजा बालेकिल्ल्यात स्वयंभू महादेवाच्या पाठीमागे आहे आणि तो उतरून खाली गेल्यावर खोल आशा दरीत उघडतो. किल्यांची माहिती आणि दुर्गम डोंगरावर प्रभुत्व असणाऱ्या मावळ्यांसाठी यातून उतरून डोंगरात गायब होणे किंवा भवानी मातेच्या मंदिरामागे जाणे सहज शक्य होते.पण जर दुसरा कोण गेला तर मात्र ती सरळ खाईतच जाणार. जर चुकून शत्रुसैनिक बालेकिल्ल्यात घुसलेच तर मावळे या वाटेमार्गे बालेकिल्ल्याच्या खाली उतरून जाणार आणि परत बालेकिल्ल्याला वेढा टाकून शत्रूस नेस्तनभूत करणार पण याची गरज पडेलीच नाही...कारण महाराजांनी गणिमाला गडाखालीच गाडले!
         गनीमी काव्याची साक्ष देणारे हे भुयार किंवा चोर दरवाजा पर्यटकांच्या आणि शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी बंदच ठेवला आहे. परंतु काळानुसार साठलेली माती आणि उगवलेली झुडपे यामुळे हा ऐतिहासिक चोर दरवाजा गायब झाला होता...!! परंतु स्थानिकांच्या माहितीनुसार आणि इतिहासातील पुराव्यानुसार आम्हाला ते भुयार मिळाले.
           माती, आजूबाजूची घरे, झाडेझुडपे यामुळे ते भुयार शोधणे कठीणच पण शोधला तर परमेश्वर ही मिळतो. मग आम्ही तर आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊनच आलेलो. भुयार जेव्हा सापडले तेव्हा त्यावर जाळी ठेवलेली. सोबतची झुडपे बाजूला सारून आम्ही जाळी सरकवली. इच्चु काट्याच्या भीतीशिवाय आत उतरलो. पावडे आणि घमेले घेतले आणि महाराजांच्या नामघोषात माती बाजूला हटवायला सुरवात झाली. गडावरच रखरखत ऊन आणि त्यावर अधून मधून दाटून येणारे ढग यामुळे उष्णतेची प्रखरता वाढली होती. पण महाराजांच्या पराक्रमाची आठवण आणि आशीर्वादाने प्रेरित झालेलो आम्हास ना ऊन ना ताण... फक्त शिवकार्याची आन..!! काम चालू होते, घाम येत होता. थोडी माती उचलून भुयाराच तोंड उचकटले. आणि तक्षणी वाऱ्याची मंद झुळूक आली. खालून दरीतून येणारा थंडगार वारा आम्हाचा घाम सोबत घेऊन गेला..हाच आमच्यासाठी शिवशीर्वाद..!! थोडं काम केलं माती दरीत फेकताना ती वाऱ्याबरोबर अंगावर येऊ लागली. डोळ्यात जाऊ लागली तरी मागे हाटतील ते आम्ही शिवभक्त मावळे कसले...!! अखेर भरपूर मेहनतीमूळे भुयार उघडले गेले. 
आणि याच आनंदात शिवप्रेमींनी गर्जना केल्या....

प्रौढप्रताप पुरंदर
महापराक्रमी रणधुरंधर
क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधीश्वर
महाराजाधिराज
महाराज
श्रीमंत...
श्री
छत्रपती
शिवाजी
महाराज
की जय.!
जय भवानी जय शिवराय..
हर हर हर महादेव...
जय भवानी जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय....!

आणि या नामघोषत आलेला थकवा कुठच्या कुठे विरून गेला समजलच नाही...!! ऐतिहासिक भुयार आता मोकळं झालं होतं...!!
           सर्वांनी एकदा डोेळेभरून भुयार पाहिलं. आणि इतरांच्या सुरक्षेच्या काळजीस्तव परत होते तसे झाकून ठेवले. आणि पुढच्या मार्गक्रमाणाला निघालो...!!
  
खरंच या भुयाराचे संवर्धन करण्याचे आणि डोलेभरून पाहण्याचे भाग्य आम्हास मिळाले...पावन झालो, धन्य झालो शिवचारणी येऊन.....!!!
© गणेश आनंदराव गोळे
           





Comments

Popular posts from this blog

किल्ले अजिंक्यतारा :- द्वारशिल्पे

अब्राहम लिंकन: फाळणी टाळणारा महापुरुष

शिवनेरी ..... माझ्या नजरेतून