Posts

Showing posts from July, 2018

अब्राहम लिंकन: फाळणी टाळणारा महापुरुष

Image
गुलामगिरीची प्रथा हा अमेरिकेला लागलेला एक कलंक आहे. वसाहतवाद ते १९ वे शतकापर्यंत अमेरिकेत काही भागात गुलामगिरीची प्रथा अस्तित्वात होती.  गुलामगिरी असावी का नसावी यावर अमेरिका दोन भागात विभागली होती. एक उत्तरभाग आणि दुसरा दक्षिण भाग.  गुलामगिरीचा प्रश्न निकालात काढावा तर यापैकी निम्मा भागाचा रोष पत्करावा लागणार. राजकीय, सामाजिक आणि धार्मिक परिस्तिथी बिघडणार. आणि कदाचित अमेरिकेचे दोन भागात विभाजन होणार....... आणि यावरच तोडगा काढण्याचे काम अब्राहम लिंकन यांनी केले. आणि तेच वी. ग. कानेटकर यांनी अब्राहम लिंकन: फाळणी टाळणारा महापुरुष या पुस्तकात प्रभावीपणे मांडले. ------------------------------------------------------------------------ हे पुस्तक लिहताना कानेटकरांनी अगदी अमेरिकेच्या उत्पत्ती ते अब्राहम लिनकांचा खून इतपर्यंत सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेची गुलामी प्रथा समजण्यासाठी आपल्याला अमेरिकेत कोलंबसचे  पाऊल, तिथला वसाहतवाद, अमेरिकेची उत्पत्ती हे समजणे खूप महत्वाचे आहे. ते पुस्तकाच्या पूर्वार्धात कानेटकरांनी व्यवस्थित नमूद केले आहे. त्यांनी पूर्वा...