अब्राहम लिंकन: फाळणी टाळणारा महापुरुष
गुलामगिरीची प्रथा हा अमेरिकेला लागलेला एक कलंक आहे. वसाहतवाद ते १९ वे शतकापर्यंत अमेरिकेत काही भागात गुलामगिरीची प्रथा अस्तित्वात होती. गुलामगिरी असावी का नसावी यावर अमेरिका दोन भागात विभागली होती. एक उत्तरभाग आणि दुसरा दक्षिण भाग. गुलामगिरीचा प्रश्न निकालात काढावा तर यापैकी निम्मा भागाचा रोष पत्करावा लागणार. राजकीय, सामाजिक आणि धार्मिक परिस्तिथी बिघडणार. आणि कदाचित अमेरिकेचे दोन भागात विभाजन होणार....... आणि यावरच तोडगा काढण्याचे काम अब्राहम लिंकन यांनी केले. आणि तेच वी. ग. कानेटकर यांनी अब्राहम लिंकन: फाळणी टाळणारा महापुरुष या पुस्तकात प्रभावीपणे मांडले.
------------------------------------------------------------------------
हे पुस्तक लिहताना कानेटकरांनी अगदी अमेरिकेच्या उत्पत्ती ते अब्राहम लिनकांचा खून इतपर्यंत सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
अमेरिकेची गुलामी प्रथा समजण्यासाठी आपल्याला अमेरिकेत कोलंबसचे पाऊल, तिथला वसाहतवाद, अमेरिकेची उत्पत्ती हे समजणे खूप महत्वाचे आहे. ते पुस्तकाच्या पूर्वार्धात कानेटकरांनी व्यवस्थित नमूद केले आहे. त्यांनी पूर्वार्धात अमेरिकेचा १८ व्या शतकापर्यंतचा प्रवास वर्णिला आहे.
अब्राहम लिंकन यांचा जन्म १२ फेब्रुवारी १८०९ अमेरिकेतील केंतुकी राज्यातील एका दुर्गम खेड्यात झाला. त्यांचे वडील सुतारकाम करत असत. व्यवसायाने काही वर्षांनी नवीन भागात स्थायिक होणे, गरिबी, अमेरिकेतील राजकीय परिस्तिथी, गुलामगिरी हे सर्व लिंकन नि त्यांच्या जवाणीतच पाहिले होते. लिंकन चे शिक्षण, नोकरी, व्यवसाय, प्रेम, लग्न, कुटुंब राजकारणातील प्रवेश, वकिली, गुलामगिरीशी संबंध आणि १९व्या शतकातील मध्यातील अमेरिकेचे राजकारण आणि लिंकन यांची राजकीय वाढत जाणारी उंची पुस्तकाच्या मध्यात रेखाटली आहे.
पुस्तकात अमेरिकेतील १९व्या शतकातील मध्यापासूनचे राजकारण रेखाटण्यात आले आहे. गुलामगिरी चा प्रश्न, फाळणीची भीती, अंतर्गत उठाव आणि लिंकन चे त्यावरील कार्य हे अतिशय उल्लेखनीय आहे. त्यांचा राष्ट्रपती पदाचा चार वर्षाचा कार्यकाल आणि १४ एप्रिल १८६५ म्हणजेच गुड फ्रायडे च्या दिवशी त्यांचा झालेला खून आणि त्याबाबतची माहिती पुस्तकाच्या उत्तरार्धात मांडली आहे.
------------------------------------------------------------------------
पुस्तकाची माहिती::--
पुस्तकाचे नाव:- अब्राहम लिंकन
लेखक :- विनायक ग कानिटकर
प्रकाशक :-दिलीपराज प्रकाशन
किंमत :- 600 रुपये
------------------------------------------------------------------------
पुस्तकाची माहिती::--
पुस्तकाचे नाव:- अब्राहम लिंकन
लेखक :- विनायक ग कानिटकर
प्रकाशक :-दिलीपराज प्रकाशन
किंमत :- 600 रुपये
------------------------------------------------------------------------
एकंदरीत बोलायचे तर हे अमेरिकेचे १६ वे जगप्रसिद्ध राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारे आणि १९व्या शतकातील अमेरिकेची राजकीय परिस्तिथी स्पष्ट करणारे सर्वोत्कृष्ट संधर्भयुक्त पुस्तक!!
एकंदरीत बोलायचे तर हे अमेरिकेचे १६ वे जगप्रसिद्ध राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारे आणि १९व्या शतकातील अमेरिकेची राजकीय परिस्तिथी स्पष्ट करणारे सर्वोत्कृष्ट संधर्भयुक्त पुस्तक!!
गणेश आनंदराव गोळे.


Comments
Post a Comment