Posts

Showing posts from 2019

जागतिक महिला दिन आणि आजची महिला

Image
          कोपर्डी, निर्भया, खैरलांजी ह्यासारखी नाव जरी कानावर पडली तरी अंगावर शहारे येतात. कौर्य आणि गलिच्छ वासनेची परिशिमा गाठणारी ह्यांसारखी अगणित दुर्दैवी घटना, मानवतेला काळिमा फासणारे प्रकार वारंवार घडत आहेत किती दुर्दैव!!           हे दुर्दैव आहे या वव्यवस्थेचे, हे दुर्दैव आहे समाज्याच्या विकृतीचे, हे दुर्दैव आहे संस्कारांचे. अशा घटना कमी होण्याच्या ऐवजी दिवसागनिस वाढतच चालल्या आहेत. एक प्रकरण कुठे संपतो ना संपतो तोच दुसरे तयार! चार पाच प्रकरणे समाज्याच्या दृष्टीस पडतात. मोर्चे निघतात, उपोषण होतात पण नंतर काय कायद्याच्या पळवाटांमुळे आरोपी मोकाट आणि कमी शिक्षा होऊन बिनधास्त! बरं चार-पाच घटनांचा समाज पाठपुरावठा करतो पण बाकी प्रकरणाचे काय? National Crime Record Beuro च्या आकडेवारीनुसार 2015 या वर्षात 34651 इतके बलात्कार आपल्या देशात झाले, म्हणजेच ऐका तासात 4ते 5 बलात्कार या देशात होतात. आणि मागील पाच वर्षातील आकडेवारी नुसार या घटना वाढतच चालल्या आहेत. समाजाच्या विकृत स्वभावामुळे काही घटना तशाच...