जागतिक महिला दिन आणि आजची महिला

          कोपर्डी, निर्भया, खैरलांजी ह्यासारखी नाव जरी कानावर पडली तरी अंगावर शहारे येतात. कौर्य आणि गलिच्छ वासनेची परिशिमा गाठणारी ह्यांसारखी अगणित दुर्दैवी घटना, मानवतेला काळिमा फासणारे प्रकार वारंवार घडत आहेत किती दुर्दैव!!
          हे दुर्दैव आहे या वव्यवस्थेचे, हे दुर्दैव आहे समाज्याच्या विकृतीचे, हे दुर्दैव आहे संस्कारांचे. अशा घटना कमी होण्याच्या ऐवजी दिवसागनिस वाढतच चालल्या आहेत. एक प्रकरण कुठे संपतो ना संपतो तोच दुसरे तयार! चार पाच प्रकरणे समाज्याच्या दृष्टीस पडतात. मोर्चे निघतात, उपोषण होतात पण नंतर काय कायद्याच्या पळवाटांमुळे आरोपी मोकाट आणि कमी शिक्षा होऊन बिनधास्त! बरं चार-पाच घटनांचा समाज पाठपुरावठा करतो पण बाकी प्रकरणाचे काय? National Crime Record Beuro च्या आकडेवारीनुसार 2015 या वर्षात 34651 इतके बलात्कार आपल्या देशात झाले, म्हणजेच ऐका तासात 4ते 5 बलात्कार या देशात होतात. आणि मागील पाच वर्षातील आकडेवारी नुसार या घटना वाढतच चालल्या आहेत. समाजाच्या विकृत स्वभावामुळे काही घटना तशाच दाबल्या जातात? मग या सर्व घटनांना जबाबदार कोण? का यावर योग्य ती कारवाई होत नाही? देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आहे आणि जर अशा घटना वाढत असतील तर कसा होईल देश महासत्ता? जातीय तिढा, कायद्यात असणाऱ्या पळवाटा, राजकीय हस्तक्षेप आणि भ्रष्टचार यामुळे आरोपी मोकाट फिरताहेत, कधी थांबणार हे.
        जगात काही देशात महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता आणि यातूनच ११७ वर्षांपूर्वी महिला दिनाची सुरवात झाली. हा संघटित स्त्री शक्तीचा विजयी नारा देणारा दिवस होता ८ मार्च १९१०. दर वर्षी महिला दिन अगदी उत्साहात साजरा होतो. सोशिअल मीडिया मुळे तर तो खूप मोट्या प्रमाणत साजरा होतोय. शुभेच्या, कविता, विनोद, कार्यक्रम यांची तर बरसातच! पण मग महिलांवरील अत्याचार का कमी होत नाहीत? का फक्त औपचारिकता आणि समाजाच्या प्रवाहाबरोबर करायचं म्हणून केलं जातंय? का एकच दिवस हा दिन पाळायचा? का बरे दररोज असा दिन पाळू जाऊ नये?
          NCRB च्या आकडेवारीनुसार महिलांवरील २०१५ सालातील अत्याचारांच्या घटनांची आकडेवारी ३,२७,३९४ इतकी आहे. का होतय अस? का महिलांना अजून संघर्ष करावा लागतोय? नोकरी, गाव, शहर, शेती, संसार, माहेर, शाळा या सर्वच क्षेत्रात महिलांवर विक्षिप्त नजरेतून पाहिलं जातंय. सगळीकडेच अन्याय सहन करावा लागतो. कधी होणार यात बदल? कधी येणार अच्छे दिन?
      इतिहास पाहता महिलांनी फार संघर्ष केलाय. अठवा त्या राजमाता जिजाऊ, आठवा त्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, आठवा त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, संत बहिणाबाई, मदर तेरेसा, कल्पना चावला.. आणि आज महिलाही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपले समाजातील स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करताहेत. मग समाज का त्यांना साथ देत नाही? आजही किती बंधने? कधी महिला मुक्त होणार समाजातील प्रथा, परंपरांची आणि अंधश्रद्धा यांच्या जाचक बेड्यातून? समाज चूल आणि मुल इतपर्यंतच का महिलांकडे बगतोय? का नाही देत त्यांच्या कर्तुत्वाला वाव?
      महिला या शब्दाबरोबर प्रेम, वासल्य, स्नेह, ममता या भावना समोर येतात. पण त्याचबरोबर शक्तीसंपन्न स्त्रीही समोर उभी रहाते. कारण आता स्त्रीही अबला राहिलेली नाही. ती सबलाही झालेली आहे.  हा आता समाज बदलतोय, पण किती? मुलीला शिकवलं जातंय, पण तिच्या मर्जीनुसार आणि विचारानुसार घडतंय का? सुज्ञ पालक मुलींना शिक्षणाचे पर्याय देताहेत पण इतर फक्त त्यांच्याशी स्पर्धा म्हणून शिकवताहेत. दिवसेंदिवस बदल घडत आहेत, आणि या बदलांकडे सकरतेने पहिले पाहिजे.
         समाज विचारानी बदलला पाहिजे, स्त्री कडे बगण्याचं दृष्टीकोन बदलला तर समाजात नक्कीच परिवर्तन होईल. आज स्त्री मुळे समाज आहे. समाजाला योग्य वळण लावायचं काम ती करते. तिला पाहताना दुर्गा देवीच्या रूपातच पाहिलं पाहिजे. आणि तिच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन हे दिलंच पाहिजे.
         समाज्याच्या जाचकतेमधून वाटचाल करणाऱ्या मातृसमान स्रीशक्तीस जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या.
गणेश आनंदराव गोळे.
संदर्भ:-
           NCRB वेबसाईट
           विकिपीडिया लिंक्स




Comments

Popular posts from this blog

किल्ले अजिंक्यतारा :- द्वारशिल्पे

अब्राहम लिंकन: फाळणी टाळणारा महापुरुष

शिवनेरी ..... माझ्या नजरेतून