विराटनगरीचे अनमोल रत्न : किल्ले वैराटगड
आमच्या गावातून सकाळच्या वेळी सूर्य डोक्यावर घेणारा वैराटगड नेहमी लक्ष खेचून घेत होता. पुण्या मुंबईला जाताना त्सरताळे गावात येताच वैराटगड त्याचे ते विशाल बाहू पसरवून बोलावू लागतो. लहानपणी इतिहासाशी अनभिज्ञ असल्याने वैराटगडावर जाऊन सुद्धा त्याचा पूर्ण परिचय झाल्यासारखं वाटत नव्हते. सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान च्या माध्यमातून पुन्हा एकदा वैराटगड चे दर्शन मिळण्याचा योग जुळला!
![]() |
गडमाता आणि पुरातन अवशेष
महादरवाजातुन वर प्रवेश करताच थंडगार वाऱ्याच्या झुळूक अंगाला स्पर्श करते. खालून एखाद्या टोपीसारखा वाटणारा हा गड वर आल्यावर मात्र एखाद्या मैदानाप्रमाणे पुढय़ात येतो. या पठारावरच मग एकेक वास्तू खुणावत पुढे येते. सदर, वाडे, शिबंदीची घरे, मंदिरे अशा अनेक बांधकामांचे हे ढिगारे आणि अवशेष वर दिसतात. म्हसोबा, लाल शेंदूर फासलेले दगड, शिवलिंग ठिकठिकाणी आढळतात. नुकतेच काही स्थानिक मुलांनी उत्खनन केले असता एक पाटा, वरवंटा, दगडी समई, उखळ, धातूचा हंडा आशा प्राचीन वस्तू सापडल्या आहेत. अजून खोदकाम केलं तर गडाची रचना आणि शस्त्र वगैरे सापडू शकतात.
तटबंधी आणि भुयारी मार्ग
पूर्व पश्चिम असा विस्तरलेला गडाचा घेर तसा फार मोठा नाही . अभेद्य काताळरूपी नैसर्गिक तटबंधी गडाला लाभली आहे. आणि जिथे गरज आहे तिथे तटबंदीचे तोरण लावलेले आहे. सातारा जिल्हा गॅझेटिअरमध्ये हा तट १७ फूट उंच आणि चांगलाच जाडजूड असल्याची नोंद आहे. बुरुज आणि ताटबंधी आज ढासळला असला तरी त्याची एकेकाळीची भव्यता लक्षात येते. सर्पाकार फिरणाऱ्या या तटावर जागोजागी बुरूज, मारगिरीच्या जागा, ढालकाठीची रचना, शोचकुपांची योजना आहेत.
गडाच्या तटातूनच पश्चिम अंगाने एक चोरवाट चोरपावलांनी म्हसवे गावा साईटला उतरते. सद्या वाट निसरडी असल्याने तिथून खाली उतरण्याची रिस्क घेऊ नये. शेजारी चोरखिंड आहे.
वैराटेश्वर मंदिर
महादरवाजापासून सरळ पूर्व बाजूला चालत गेल्यानंतर अनेक तळी लागतात. ही तळी गडावरील इमारती बांधण्यासाठी जे दगड वापरले त्यासाठी खोदण्यात आली असावीत. त्याचप्रमाणे तटबंदीसाठी ही याच तळ्यातील तळ्यातील दगड वापरले असावेत. मंदिराकडे जाताना एक पार लागतो. पारावर बसून गप्पा मारून थोडं पुढे गेल्यावर एक छानसे मंदिर आढळते. पुरातन दगडी गाभारा आणि नवीन बनविलेला पत्र्याचा सभांडप असलेले हेच ते वैराटेश्वर महादेवाचे मंदिर! मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात संत अभयानंद गिरी महाराजांच वास्तव्य होत. अगदी पाच दहा वर्षपूर्वी शेजरच्या इमारती मध्ये अभयानंद महाराजांचे शिष्य राहत होते. मंदिराच्या सभा मंडपामध्ये एका वेळेस चाळीस-पन्नास लोक बसू शकतात. तसेच शेजारच्या घरामध्ये(जे की आता बंद असते) 20 ते 25 लोक राहू शकतात.
वैराटेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी थोडं वाकून जावं लागतं. आत मध्ये सुबक अस शिवलिंग आणि गणपतीची मूर्ती आहे. गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. गडावरती येण्यासाठी केलेली चढाई या प्रसन्नतेत जशी हरवून जाते समजतही नाही. गाभाऱ्याच्या बाहेर एक नंदी आणि कासव आहे. नंदी नुकताच तलाव साफ करताना सापडलेला आहे. मंदिराच्या सभा मंडपात यज्ञ करण्यासाठी यज्ञ बनवलेला आहे.
वैराटेश्वर मंदिराच्या बाजूला यमाई देवीचे मंदिर जीर्ण अवस्थेत शेवटच्या घटिका मोजत आहे.
वीरगळ आणि सतीशीळा
मंदिराच्या सभामंडपामध्ये एक विरघळ पहायला मिळते. एखाद्या व्यक्तीला लढाई करताना अथव गावाची रक्षा करताना अथवा गुरांचे संरक्षण करताना वीरमरण आले तर त्याची आठवण म्हणून कोरलेला दगड होय. मंदिरा बाहेर असणारी वीरगळ ही लढाईत वीरमरण आलेल्या योद्धयची आहे.
तिहासातील महत्वपुर्ण असणारी वीरगळ आणि सतीशीळा आवर्जून पाहण्यासारख्या आहेत. इतिहासाचा दुर्मिळ ठेवा पाहण्यासाठी आवर्जून वैराटगड ला भेट द्या.
मारुती मंदिर
वैरागडावर महादरवाजाच्या बाजूला एक मंदिर आहे. त्यामध्ये मारुतीची सुबक मूर्ती आहे. सध्या आजूबाजूच्या गावातील लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच स्मारक तिथे उभारले आहे. मारुती मंदिराच्या बाहेर अजून एक मारुतीची मूर्ती आहे, कदाचित महादरवाजा पडल्यामुळे महादरवाजाच्या आजूबाजूला असलेली मूर्ती तिथे स्थान बद्द केली असावी.प्राचीन शिलालेख
गडाच्या पश्चिम बाजूला आणि चोरवाटेच्या वर पातळ दगडावर दोन्ही बाजूला अस्पष्ट असा शिलालेख कोरलेला आहे. शिलालेख जमिनीत गाडलेल्या चिऱ्यासारखा आहे. त्या शिलालेखाची अजून उकल झाली नाही.

दुपारी ठीक दोन वाजता आम्ही गड उतरायला सुरुवात केली. साधारण अर्ध्या तासात आम्ही गड उतरला. चिल्या पिल्या सरनौबतांनी गडाच्या पायथ्याला असलेल्या रानमेव्याचा आस्वाद घेतला. गडावच्या पायथ्यालाच राहुल दादांच्या घर आहे. तिथे प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष ह भ प श्री हिंदुराव दादा आणि प्रतिष्ठानचे सरचिटणीस श्री विठ्ठल दादा त्यांच्या वेळात वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन करण्यास आले. लिंबू पाण्यासोबत थोडीशी चर्चा करून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
©गणेश आनंदराव गोळे
.jpeg)




.jpeg)






.jpeg)








.jpeg)










Comments
Post a Comment