ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा
#२०१७_आवडते_पुस्तक #2017_best_book ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा "इतिहासाला जो विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही" हे सत्यवचन आहे. इतिहास अनेक अनेक प्रकारे समजू शकतो. त्यासाठी अनंत साधने आहेत. कादंबरी, शोधग्रंथ, निबंधमाला ही जनमानसात रुजलेली आणि विस्तृतपणे इतिहास समजण्यास मदत करणारी साधने. इतिहास अध्ययनाचे आणि वाचकांचे अनेक प्रकार असू शकतात. त्यापैकी इतिहास प्रेमी, इतिहास अभ्यासक आणि इतिहास संशोधक याप्रकारे एक वर्गवारी होऊ शकते. इतिहासप्रेमी हे इतिहास वाचनासाठी कादंबरी, लेखमाला, काही प्रसिद्ध ग्रंथांचा आधार घेतात. इतिहास अभ्यासक हे बखरी, ग्रंथ, डायरी, पत्रे, शिलालेख, पुरातन नकाशे यांचा आधार घेतात. तर इतिहास संशोधक हे अपरिचित इतिहासाची उकल करण्यासाठी अनेक प्रकारचे संशोधन करून ग्रंथ लिहतात. सत्य जगासमोर मांडून इतिहासात भर घालतात. सामान्य वाचक हे घटनेतील कल्पकता आणि मनोरंजन यावर भर देतात. आणि त्यांना जर इतिहास ...