पर्यावरण रक्षणासाठी लढणारे MRA सेंटर
काल ५ जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन...!! प्रदूषण, औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि लोकांची मानसिकता आजकाल पर्यावरण ऱ्हासाला नकळत का होईना आलिंगन देत आहेत. जागतिक पातळीवर यावर मात करण्यासाठी विविध संस्था, देश कार्यरत आहेत. पर्यावरण दिनाचे अवचित्य साधून पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न करत आहेत. पर्यावरण रक्षणासाठी अब्जावधी रु खर्च होत आहेत. परंतु पर्यावरण रक्षण नुसत्या पैशाच्या आधारे सध्या होईल का??? मानसिकता बदलणे पैशाने शक्य आहे का??? काही संस्था नि फक्त पर्यावरण दिनाचे अवचित्य साधून पर्यावरणाचा घसरलेला समतोल सुस्तीतीत येईल का??? याची या प्रश्नांची उत्तरे ही नाही या स्वरूपाचीच असतील.
पर्यावरण रक्षण हे फक्त एका दिवसाचे काम नसून अविरत जगायचे ध्येय आहे. पर्यावरण रक्षण नुसत्या पैशाने साध्य होणारी गोष्ट नसून त्यासाठी स्वतःची मानसिकता बदलून कार्य करायची गोष्ट आहे. पर्यावरण रक्षण ही स्वतःची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाची मानसिकता बदलून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही यासाठी कारायचे सामूहिक कार्य आहे. यासाठीच प्रेम, पवित्रता, निस्वार्थता व प्रामाणिकपणा ही मूल्ये आत्मसात करून पर्यावरण रक्षणासाठी अविरत कार्य करणाऱ्या संस्थापैकी एक संस्था म्हणजे MRA centre. काल पर्यावरण दिनाचे अवचित्य साधून पर्यावरण रक्षणासाठी देवदूत ठरलेल्या MRA सेंटर पाचंगणी ला भेट दिली. कामाच्या गडबडीतून काढलेला वेळ मिळालेल्या मूल्यांमुळे लक्षपट फलदायी आणि उर्जादेणारा ठरला.
MRA सेंटर-
Comments
Post a Comment