किल्ले अजिंक्यतारा :- द्वारशिल्पे
किल्ले अजिंक्यतारा वरील द्वारशिल्पांचा आढावा
गडकिल्यावर प्रवेश करायचे असेल तर मुख्य प्रवेशद्वाराशिवाय पर्याय नसतो.... कारण चहूबाजूने गडाला भक्कम आशा तटबंदीने बंदीस्त केलेलं आढळते.....गडाचे प्रवेशद्वार आणि तटबंदी त्याच्या भक्कमतेची साक्ष देतात.... द्वार जितके भक्कम तितकाच गड ही भक्कम!!! म्हणूनच गडाची तटबंदी आणि द्वारे विशेष पद्धतीने बनवलेली दिसतात. ती बनविताना जो नाजूक भाग असतो त्यावर सहसा प्रहार होणार नाही किंवा तो लक्षात येणार नाही याची पुरेपुर दक्षता घेतलेली असते.... त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्या नवख्या व्यक्तीवर, शत्रूच्या वकीलावर किंवा इतरांवर विशेष छाप पडावी यासाठी द्वारावर काही शिल्पे कोरलेली आढळतात. त्यांना द्वारशिल्प असे संबोधतात. यातून आपल्याला अनेक गोष्टी कळू शकतात.
द्वारशिल्पं म्हणजे प्रवेशद्वारावर असणारे किल्ला बांधणाऱ्या, जिंकणाऱ्या राजसत्तेचे राजचिन्हे!!! द्वारावर द्वारशिल्प म्हणून काही देवताही आढळून येतात. त्या प्रकोप दूर करणे किंवा भक्तीभावची निशाणी म्हणून आढळतात. कोणती राजवट गडावर राज्य करत होती हे ती द्वारशिल्प सांगून टाकतात. शरभ, गंडभेरुड, कमळ, चक्रे आणि देवदेवता अशी अनेक प्रकारची द्वारशिल्पे मंदिर आणि गडांच्या प्रवेशद्वारावर आढळतात.

फेकबुक सातारा तर्फे ग्रेगेरीअन वर्षाच्या शेवटच्या दिवशी समाजकार्य करण्याच्या हेतूने सकल सातारकर बांधवांची पहिलावहिली मोहीम आयोजित करण्यात आली. मोहिमेची सुरवातच हिंदवी स्वराज्याची चौथी राजधानी असलेल्या आणि इतिहासाच्या पाउलखुणांनी आपली छाप उठविणाऱ्या सातारच्या अजिंक्यतारा या दुर्गावरून केली. परकीय आक्रमणे झेललेल्या या गडाचे प्रवेशद्वार आणि तटबंदी सुस्तीतीत असून त्याच्या भक्कमतेचा पुरावा देतात. गडावर प्रवेश करताना लागणारे मुख्य प्रवेशद्वारावर अनेक शिल्प कोरलेली आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात.
शरभ:-
गडाच्या प्रवेशद्वारच्या पुढे आल्यावर समोरच आपणास दरवाजच्या थेट वरती दोन शिल्प दिसतात. सिंहरूपी देहाला व्याल चे तोंड, लांब अशी शेपटी आणि कधी पंख असतात त्यांला शरभ असे बोलले जाते. अजिंक्यतारा गडावरील शरभ हा जेता(विजेता) या प्रकारचा आहे. त्याच्या पायाखाली हत्ती दाबलेले दिसतात. याचा अर्थ हत्तीरूपी पातशाह्यांना गाडण्यात यशस्वी झालेले राजे!!!
भारतीय पौराणिक शास्त्रात ही शरभविषयी माहिती भेटते. ती पुढील प्रमाणे "हिरण्यकशप हा भक्त प्रल्हादाचा खूप छळ करत होता. त्यासाठी भगवान विष्णूनी नृसिह हे आक्राळ विक्राळ रूप धारण करून हिरण्यकशप चा वध केला. परंतु नृसिंह रुपात असलेला विष्णुचा राग शांत झाला नाही. त्यानी लोकांना उपद्रव द्यायला सुरवात केली. शेवटी देव भगवान शंकरानां शरण गेले आणि प्रार्थना सुरु केली. ती ऐकून शंकरांनी नृसिंहाला शिक्षा करण्यासाठी म्हणून पशू, पक्षी व नर यांची एकत्रित शक्ती घेतली आणि नृशिंह ला शेपटीत पकडून हरवले. ज्यावेळी नृशिंह चा क्रोध शांत झाला त्यावेळी त्यांना शरभ हे भगवान शंकर असलेले समजले. आणि ते परत मूळ रुपात दाखल झाले. भगवान शंकराचे हे रूप म्हणजेच शरभ."

गंडभेरुड:-
प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला की उजव्या हाताला सैनिकांच्या बैठकीच्या खाली दोन डोकी, पंख आणि चार पाय असणारे शिल्प आढळते त्याला गंडभेरुड असे बोलतात.दोन डोकी आणि एक धड असलेल्या गरुड म्हणजे गंडभेरुंड. गंडभेरुडाच्या चोच आणि पायात शरभ किंवा हत्ती आढळतात. हिंदू संस्कृतीव्यतिरिक्त इतर अनेक पुरातन संस्कृतींत दोन डोकी आणि एक धड असलेल्या पक्ष्याचा उल्लेख आढळतो. बहामनी सत्तेबरोबरच विजयनगरचे साम्राज्याचे ही गंडभेरुड हे प्रतीक हिते.

कामळफुल, कलश आणि चक्रे:-
ही शिल्पे आपणास प्रवेशद्वारच्या कमानीवर आणि आतील बाजूस आढळून येतात. ही सजावट किंवा काही संदेशात्मक चिन्हे असू शकतात.

गणपती:-
विघ्नहर्ता गणराय ही देवता छ शाहूमहाराजांच्या काळात लोकप्रिय झाली होती. पेशव्यांची आणि मराठ्यांची ती आराध्य देवता आहे. त्यामुळे गणपतीला प्रवेशद्वारावर प्रामुख्याने स्थान देण्यात आले. अजिंक्यतारा किल्ल्याच्या दरवाजाच्या चौकटीवर आपणास गणपती पहावयास मिळतो.

मारुती:-
मारुती ही देवता आपणास दरवाजयच्या बाजूला दिसून येते. मारुतीला बल आणि रक्षणाची देवता बोलले जाते.

द्वारशिल्पावरून आपण पुरातन इतिहासाची उकल करू शकतो त्यासाठी त्यावर संशोधन होणे अत्यंत गरजेचे आहे. द्वारशिल्पांची अधिक माहिती महेश तेंडूलकर यांच्या "गड मंदिरावरील द्वारर्शिल्प" तसेच . डॉ ग. ह. खरे यांच्या ‘मूर्तिविज्ञान’ या ग्रंथातुन मिळू शकते.
©गणेश आनंदराव गोळे

Comments
Post a Comment