शोधांच्या कथा- कृष्णविवरे
कृष्णविवर काय असते? ते कसं बनते? आशा अनेक प्रश्नांची उत्तरे विज्ञानाकडे आहेत. अनेकांना या विषयी कुतुहुल आणि कृष्णविवरे जाणून घेण्याची इच्छा असते. आशा सर्व विज्ञानवादी वाचकांसाठी सर आयझॅक आसिमॉव्ह आपल्या कृष्णविवरे या पुस्तकाद्वारे परवानीच देेतात. मूळ इंग्रजी स्वरूपातील पुस्तक सुजाता गोडबोले अप्रतिम अशा मराठी शैलीत अनुवादित करून मराठी वाचकांसाठी उपलब्द करतात. न्यूट्रोण, पल्सार, महाकाय तारे यांसारख् घटकांची माहितीही या पुस्तकात समजायला सोप्या आशा शब्दात करून देतात. कृणविवरांची रचना, ताचे प्रमुख घटक, गुणधर्म आणि प्रकार याचा सचित्र माहितीबरोबरच श्वेतबटू, न्यूट्रोण, पल्सार यांसारख्या अवकाशीय घटकांची माहितीही या पुस्तकात दिली आहे.
पुस्तकाचे नाव:- शोधांच्या कथा- कृष्णविवरे
लेखक:- आसिमॉव्ह आयझॅक
अनुवाद:- गोडबोले सुजाता
प्रकाशन:- मनविकास प्रकाशन
पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती :--
रात्री अवकाशात मंद अशा वातावरणात लूक लूक चमकणाऱ्या चांदण्याना तारे असे संबोधतात. सूर्य हा आपल्या पृथ्वीपासून जवळ असलेला एक तारा आहे. रात्री अवकाशात दिसणारे तारे हे सूर्या पेक्षा कितीतरी पट मोठे किंवा छोटे तारे असतात. परंतु ते पृथ्वीपासून इतके दूर असतात की आपल्याला त्या रात्रीच्या वेळी लुकलूकणार्या चांदण्या दिसतात.
तारा खूप प्रकाशमान असतो. त्याच्या प्रकाशाचा स्रोत हा त्यामध्ये असलेल्या हायड्रोजन चे स्फोट. हायड्रोजन चे रूपांतर हेलियम मध्ये होताना खूप मोठ्या प्रमाणावर उष्णता आणि प्रकाश बाहेर पडतो. हायड्रोजन हा तारीच्या ज्वलनातील इंधन म्हणून काम करतो. इंधन कधी ना कधी संपणारच असते. ताऱ्यातील हे अनुइंधन संपले की तो स्वतःच्या केंद्राकडे ढासळू लागतो. असे होताना त्याचे घनत्व वाढते आणि आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात गुरुत्वकर्षण वाढते. ते इतके वाढते की आशा ताऱ्यावरील escape velocity प्रकाशाच्या वेगापेक्षाही अधिक होते. आशा वेळी त्यातून कोणतीही गोष्ट किंवा प्रकाश बाहेर पडू शकत नाही. यामुळे तो तारा दिसत नाही किंवा एक ब्लॅक hole सारखे दिसते.आणि यालाच कृष्णविवर असे संबोधतात. थोडक्यात बोलायचे तर कृष्णविवर ही मोठ्या ताऱ्याच्या जीवनातील शेवटची अवस्था असते. तामुळे तो तारा दिसत नाही. यालाच कृष्णविवर म्हणतात.
यासोबतच या पुस्तकात लेखकाने श्वेत बटू, भ्रमांडाची सीमा आणि ताऱ्यांवर शेवटच्या स्थितीत होणारे स्फोट, प्लसार आणि न्यूट्रॉन तारे, तेजोमेघ, भरती ओहोटी आणि गुरुत्वकर्षण बाहेर पडण्याची गती सविस्तर पणे मांडली आहे. विज्ञानाचे ज्ञान असणाऱ्यांना पटदिशी समजेल असे हे पुस्तक आहे. पुस्तकात सिद्धांतासोबतच परिपूर्ण छायाचित्रे दिली आहेत.
सर्वांनी अवश्य वाचावे असे पुस्तक!
©गणेश आनंदराव गोळे
Comments
Post a Comment