१५२ वर्षानंतर घडणाऱ्या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार
मान्य करा अथवा करू नका परंतु मानवाला स्वतःच्या गरजा सोडून सतत नवं, अचंबनिय, थरारक, अद्भुत अस काही ना काही हवं असत. त्याच्याच शोधत तो रमलेला असतो. त्यालाच तो जीवन समजत असतो. कधी क्रोधीष्ट तर कधी प्रेमळ, कधी कुरूप तर कधी सुंदर, कधी लहानसा तर कधी आक्राळ विक्राळ असा भासणारा निसर्ग मानवाच्या मूलभूत गरजांसोबत इतर गरजा भागविण्यासाठी कटीबद्द असतो. बदल हा निसर्गाचा नियम आहे. कधी कोणता बदल होईल हे सांगता येत नाही. कधी कोणता कोणता चमत्कार होईल सांगता येत नाही. खगोलीय घटना हा निसर्गाचा जणू एक चमत्कारच...!!!! खगोलीय घटनांची रेलचेल असल्याने हिंदू संस्कृतीत पौर्णिमा आणि अमावस्येला खूप मोठे सांस्कृतिक स्थान लाभलेलेे आहे. यामध्ये भरटी- ओहोटी, दाबाचे पट्टे, पौर्णिमेला चंद्रग्रहण - अमावस्येला सूर्यग्रहण, नौसर्गिक चक्रात बदल या घटना पाहायला मिळतात. म्हणूनच हिंदू सण संस्कृती यावर अवलंबून असावेत.
आज बुधवार दिनांक ३१ जानेवारी २०१८. आज माघी पौर्णिमा म्हणजेच चुडी पौर्णिमा. आजचा दिवस हा खगोल प्रेमी साठी अनमोल आणि अलौकिक असाच दिवस ठरला आहे. खगोलीय घटनांमध्ये सुपर मुन, ब्लू मुन, ब्लड मुन(खग्रास चंद्रग्रहण) यांसारखे सोहळे वर्षनुवर्षं पाहायला मिळतात. परंतु ह्या तीनही सोहळ्यांचा चमत्कार निसर्गाने आजच्या दिवशी म्हणजेच चक्क १५२ वर्षानंतर अवकाशात घडवाला!!! आणि ते आपल्या पिढीला पाहायला मिळाले म्हणूनच तर हा दिवस अविस्मरणीय असा ना भूतो ना भविष्यतो ठरला.
आजच्या दिवशी चंद्र पृथ्वीपासून सरासरीपेक्षा खूप जवळ आला. त्यामुळे तो नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी दिसला. हा अवकाशीय सोहळा भारतात तसेच आशियातील काही ठिकाणाहून अगदी उघड्या डोळ्यांनी उत्तम प्रकारे पाहता आला. आशिया खंडात ३१ मार्च १८६६ नंतर पहिल्यांदाच म्हणजे तब्बल १५२वर्षांनी तर रशियात तब्बल ३५ वर्षांनंतर आला. आपणास या अवकाशीय सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्यही लाभले. त्या घडलेल्या अवकाशीय घटनांची माहिती पाहूया:
ब्लुमून:-
इंग्रजी कालगणनेतील(ग्रेगेरीण) एका महिन्यात एक पोर्णिमा व एक अमावस्या असते. पण जेंव्हा एकाच महिन्यात दोन पोर्णिमा येतात तेंव्हा त्या दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्लुमून असे म्हटले जाते. ब्लुमून म्हणजे निळा चंद्र असा अर्थ नव्हे! ब्लुमून हा नेहमीसारखाच असतो.

चंद्रग्रहण:-
जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण ही खगोलीय घटना घडते . पौर्णिमेला सूर्य व चंद्र एकाच दिशेला उगवतात. त्यामुळे चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशी दिसते(काही वेळा आदल्या किंवा दुसऱ्या दिवशीही दिसू शकते).

चंद्रग्रहण हे पौर्णिमेला घडते परंतु ते प्रत्येक पौर्णिमेला न घडण्यामगचे कारण हे, "चंद्रकक्षा व क्रांतिवृत समपातळीत नसून त्यांच्या पातळयांमध्ये ५ अंशांचा ९' चा कोन असतो. म्हणजेच सूर्य व पृथ्वी चंद्रपेक्षा पूर्वेलाच किंवा पश्चिमेला असते तर पृथ्वी सूर्याच्या उत्तरेस किंवा दक्षिणेस असते, मग अशा वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडणारच नाही. म्हणजे चंद्रग्रहण होणार नाही. पुथ्वीची छाया चंद्रावर न पडता ती उत्तर किंवा दक्षिणेकडून जाईल. अशावेळी पृथ्वीवरून चंद्रग्रहण दिसणारच नाही. पृथ्वीची सावली चंद्रावर पडली तरच चंद्रग्रहण होईल. पण त्यासाठी त्यांचे पूर्व पश्चिम व दक्षिण उत्तर अंतर शून्य किंवा कमीत कमी व्हायला हवे."
चंद्र पूर्णपणे झाकला जातो त्या परिस्थितीला खग्रास चंद्रग्रहण बोलतात. तर चंद्र आंशिकतः झाकला जातो त्याला खंडग्रास चंद्रग्रहण बोलले जाते.
प्रकाशामुळे पडणारी एखादी सावली मध्यभागी गडद किंवा घनदाट असते. तर ती बाजूला फिकट किंवा कमी गडद होत जाते. याच प्रमाणे सुर्यामुळे पृथ्वीची सावली प्रछाया(umbra) व उपछाया(penumbra) आशा प्रकारात मोडली जाते. प्रछाया सावलीच्या मध्यभागी असून सूर्यकिरणे पूर्णपणे मिटली जातत. आणि उपछाया प्रछायेच्या भोवती असून सूर्यकिरणे अंशीक स्वरूपात असतात.
![]() |
| चांद्रग्रहणाची स्थिती |
चंद्र परिक्रमना करत प्रथम उपछायेत येतो. त्यावेळी चंद्रप्रकाश कमी होतो. यालाच ग्रहणाचे वेध लागले असे म्हणतात.त्यानंतर चंद्र प्रछायेत येतो तेव्हा चंद्राचा भाग झाकाळलेला दिसतो. तेव्हा चंद्रग्रहण लागले असे म्हणतात.कालांतराने चंद्र प्रछायेतून बाहेर पडतो व पुन्हा प्रकाशित होतो. तेव्हा ग्रहण सुटले असे म्हणतात. त्यानंतर काही काळ चंद्र उपछायेत असतो तेव्हा त्याचा प्रकाश कमी असतो.काही वेळाने जेव्हा चंद्र उपछायेतून बाहेर पडतो तेव्हा पौर्णिमेचा चंद्र नेहमीसारखा प्रकाशमान होतो. चंद्रग्रहणे पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे दिसतात.
![]() |
| चंद्रग्रहण सुटताना |
ब्लड मून:-
ज्यावेळी ग्रहण होते त्यावेळी चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून (penumbra) जातो. तेंव्हा प्रकाश किरणांचे विकीरण होऊन निळ्या रंगाच्या छटा शोषल्या जावून नारंगी लाल रंग तेवढाच शिल्लक राहतो, यामुळे चंद्र प्रछायेत लालसर दिसतो. चंद्राच्या या स्थितीला ब्लड मून असे म्हणतात.

| ब्लड मुन |
सुपरमून:-
पृथ्वीपासून चंद्र सरासरी 3 लाख ८४ हजार किलोमिटर अंतरावर असतो. चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने भ्रमण करीत असल्यामुळे कधी पृथ्वीच्या जवळ (perigee) तर कधी दूर (apogee) जातो. ज्यावेळी पौर्णिमेचा किंवा अमावस्येचा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ अंतरावर येतो तेंव्हा त्या घटनेला सुपरमून असे म्हटले जाते. आज तो सुमारे 3 लाख ५८ हजार किलोमिटर अंतरावर आला. म्हणून तो नेहमीपेक्षा १४ टक्के मोठा तर ३० टक्के अधिक तेजस्वी दिसाला.

| नेहमीपेक्षा तेजस्वी चंद्र |
चांद्रग्रहणाची स्तिथी/ दिशा:-
पूर्व दिशेच्या वरच्या अंगाला म्हणजेच ईशान्य दिशेला आणि कर्क(कॅन्सर) राशीच्या थोडस खाली ही अलौकिक घटना घडली.
पूर्व दिशेच्या वरच्या अंगाला म्हणजेच ईशान्य दिशेला आणि कर्क(कॅन्सर) राशीच्या थोडस खाली ही अलौकिक घटना घडली.
![]() |
| ईशान्य दिशेचा चंद्र |
घटनाक्रम:-
बुधवार दिनांक ३१ जानेवारी २०१८ तारखेला सायंकाळी सूर्यग्रहणास प्रारंभ झाला.
१)खगोलशास्त्रानुसार ठिक ५वा.१८मिनिटांनी ग्रहणास सुरुवात झाली. त्यावेळी चंद्र उपछायेत(penumbra) मध्ये प्रवेश करतो.
२)परंतु पश्चिममहाराष्ट्रात सायंकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी चंद्रोदय झाला. त्यावेळी चंद्र किंचितसा दिसत होता तो ९०% हू अधिक ग्रासलेल्या स्थितीतच दिसत होता.
३)६ वाजून ३० मिनिटांनी चंद्रबिंब पूर्णपणे ग्रासले जावून त्याचा रंग लालसर दिसला. त्यावेळी चंद्र हा पृथ्वीच्या प्रछायेत होता. ही स्थिती साधारण ७ वाजून २९ मिनिटा पर्यंत पाहायला मिळाली.
४) ७वाजून २९मिनिटांनी चंद्राने परत उपछायेत (penubra) गेला.
५) तिथून पुढे ग्रहण सुटण्यास प्रारंभ झाला त्यावेळी बाकी चंद्र लालसर आणि एकदम थोडा लक्ख प्रकाशमय दिसल्याने डायमंड रिंग सारखा भास झाला( डायमंड रिंग सुर्यग्रहणात होते).
६)८ वाजून ४२ मिनिटांनी ग्रहण पूर्णपणे संपले.

खगोलशास्त्रानुसार जवळपास आणखी १९-२० वर्षांनी म्हणजेचदि. ३१ जानेवारी २०३७ रोजी पुन्हा तिहेरी योग जुळून येईल. तोपर्यंत आजच्या सुपर-ब्ल्यू- ब्लड मून या अद्भुत घटनांची आठवण आयुष्यभर साठवून राहील.
संदर्भ:-
विकिपीडिया
Skymap
©गणेश आनंदराव गोळे

Comments
Post a Comment