Posts

वाईचा पाठीराखा: पांडवगड

Image
वाईच्या वायव्येस (वाई ता. १७' ५५' उ., ७३' ५०" पू. उंची १,२७३ मीटर) ६ कि. मी. अंतरावर  वर आपल्या बलाढ्य नैसर्गिक रचनेने लक्ष वेधून घेतो तो विराटनगरीचा पाठीराखा पांडवगड ! चौरस माथा असलेला या गडाच्या सौन्दर्यावर मोहून इकडे पावले ओढ घेत असतात. या गडाला पांडुगड असेही बोलले जाते. इतिहास कोल्हापूरचे शिलाहार राजा दुसरा भोज याने सातारा जिल्यात जे काही दुर्ग निर्माण केले त्यापैकी पांडवगड हा एक! याची निर्मिती ११७८ ते ११९३ या कालखंडात केली असावी. [सातारा गॅझेटिअर, १८८५, पृ. ५३५.] स्थानिक लोकांच्या मते पांडव अज्ञातवासात असताना इथे राहिले होते आणि त्यावरूनच याचे नाव पांडवगड पडले.  परंतु याला इतिहास-संशोधकांची मान्यता नाही, कारण पांडव या भागात आलेलेच नव्हते. 'वाई ही महाभारत काळात विराटनगरी होती व पांडव अज्ञातवासात इथे पांडवगडावर राहिले'  समजूतीला इतिहास तज्ञांना कोणताही पुरावा मिळालेला नाही. सन १६४८ मध्ये हा वाईच्या विजापूर दरबारच्या मोकासदाराच्या ताब्यात होता.  १२ ऑक्टोबर १६७३ रोजी व पांडवगड किल्ल्यावर मराठा फौजेने हल्ला चढवला. आणि १३ ऑक्टोबर रोजी मराठ्यांनी पांडवगड जिंकला य...

शोधांच्या कथा- कृष्णविवरे

Image
कृष्णविवर काय असते? ते कसं बनते? आशा अनेक प्रश्नांची उत्तरे विज्ञानाकडे आहेत. अनेकांना या विषयी कुतुहुल आणि कृष्णविवरे जाणून घेण्याची इच्छा असते. आशा सर्व विज्ञानवादी वाचकांसाठी सर आयझॅक आसिमॉव्ह आपल्या कृष्णविवरे या पुस्तकाद्वारे परवानीच देेतात. मूळ इंग्रजी स्वरूपातील पुस्तक सुजाता गोडबोले अप्रतिम अशा मराठी शैलीत अनुवादित करून मराठी वाचकांसाठी उपलब्द करतात. न्यूट्रोण, पल्सार, महाकाय तारे यांसारख् घटकांची माहितीही या पुस्तकात समजायला सोप्या आशा शब्दात करून देतात. कृणविवरांची रचना, ताचे प्रमुख घटक, गुणधर्म आणि प्रकार याचा सचित्र माहितीबरोबरच श्‍वेतबटू, न्यूट्रोण, पल्सार यांसारख्या अवकाशीय घटकांची माहितीही या पुस्तकात दिली आहे. पुस्तकाचे नाव:- शोधांच्या कथा- कृष्णविवरे लेखक:- आसिमॉव्ह आयझॅक अनुवाद:- गोडबोले सुजाता प्रकाशन:- मनविकास प्रकाशन पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती :--            रात्री अवकाशात मंद अशा वातावरणात लूक लूक चमकणाऱ्या चांदण्याना तारे असे संबोधतात. सूर्य हा आपल्या पृथ्वीपासून जवळ असलेला एक तारा आहे. रात्री अवकाशात दिसणारे तारे हे सूर्या पेक्षा क...

जागतिक महिला दिन आणि आजची महिला

Image
          कोपर्डी, निर्भया, खैरलांजी ह्यासारखी नाव जरी कानावर पडली तरी अंगावर शहारे येतात. कौर्य आणि गलिच्छ वासनेची परिशिमा गाठणारी ह्यांसारखी अगणित दुर्दैवी घटना, मानवतेला काळिमा फासणारे प्रकार वारंवार घडत आहेत किती दुर्दैव!!           हे दुर्दैव आहे या वव्यवस्थेचे, हे दुर्दैव आहे समाज्याच्या विकृतीचे, हे दुर्दैव आहे संस्कारांचे. अशा घटना कमी होण्याच्या ऐवजी दिवसागनिस वाढतच चालल्या आहेत. एक प्रकरण कुठे संपतो ना संपतो तोच दुसरे तयार! चार पाच प्रकरणे समाज्याच्या दृष्टीस पडतात. मोर्चे निघतात, उपोषण होतात पण नंतर काय कायद्याच्या पळवाटांमुळे आरोपी मोकाट आणि कमी शिक्षा होऊन बिनधास्त! बरं चार-पाच घटनांचा समाज पाठपुरावठा करतो पण बाकी प्रकरणाचे काय? National Crime Record Beuro च्या आकडेवारीनुसार 2015 या वर्षात 34651 इतके बलात्कार आपल्या देशात झाले, म्हणजेच ऐका तासात 4ते 5 बलात्कार या देशात होतात. आणि मागील पाच वर्षातील आकडेवारी नुसार या घटना वाढतच चालल्या आहेत. समाजाच्या विकृत स्वभावामुळे काही घटना तशाच...