Posts

Showing posts from 2018

अब्राहम लिंकन: फाळणी टाळणारा महापुरुष

Image
गुलामगिरीची प्रथा हा अमेरिकेला लागलेला एक कलंक आहे. वसाहतवाद ते १९ वे शतकापर्यंत अमेरिकेत काही भागात गुलामगिरीची प्रथा अस्तित्वात होती.  गुलामगिरी असावी का नसावी यावर अमेरिका दोन भागात विभागली होती. एक उत्तरभाग आणि दुसरा दक्षिण भाग.  गुलामगिरीचा प्रश्न निकालात काढावा तर यापैकी निम्मा भागाचा रोष पत्करावा लागणार. राजकीय, सामाजिक आणि धार्मिक परिस्तिथी बिघडणार. आणि कदाचित अमेरिकेचे दोन भागात विभाजन होणार....... आणि यावरच तोडगा काढण्याचे काम अब्राहम लिंकन यांनी केले. आणि तेच वी. ग. कानेटकर यांनी अब्राहम लिंकन: फाळणी टाळणारा महापुरुष या पुस्तकात प्रभावीपणे मांडले. ------------------------------------------------------------------------ हे पुस्तक लिहताना कानेटकरांनी अगदी अमेरिकेच्या उत्पत्ती ते अब्राहम लिनकांचा खून इतपर्यंत सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेची गुलामी प्रथा समजण्यासाठी आपल्याला अमेरिकेत कोलंबसचे  पाऊल, तिथला वसाहतवाद, अमेरिकेची उत्पत्ती हे समजणे खूप महत्वाचे आहे. ते पुस्तकाच्या पूर्वार्धात कानेटकरांनी व्यवस्थित नमूद केले आहे. त्यांनी पूर्वा...

पर्यावरण रक्षणासाठी लढणारे MRA सेंटर

           काल ५ जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन...!! प्रदूषण, औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि लोकांची मानसिकता आजकाल पर्यावरण ऱ्हासाला नकळत का होईना आलिंगन देत आहेत. जागतिक पात...

१५२ वर्षानंतर घडणाऱ्या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार

Image
            मान्य करा अथवा करू नका परंतु मानवाला स्वतःच्या गरजा सोडून सतत नवं, अचंबनिय, थरारक, अद्भुत अस काही ना काही हवं असत. त्याच्याच शोधत तो रमलेला असतो. त्यालाच तो जीवन समजत असतो. कधी क्रोधीष्ट तर कधी प्रेमळ, कधी कुरूप तर कधी सुंदर, कधी लहानसा तर कधी आक्राळ विक्राळ असा भासणारा निसर्ग मानवाच्या मूलभूत गरजांसोबत इतर गरजा भागविण्यासाठी कटीबद्द असतो. बदल हा निसर्गाचा नियम आहे. कधी कोणता बदल होईल हे सांगता येत नाही. कधी कोणता कोणता चमत्कार होईल सांगता येत नाही. खगोलीय घटना हा निसर्गाचा जणू एक चमत्कारच...!!!! खगोलीय घटनांची रेलचेल असल्याने हिंदू संस्कृतीत पौर्णिमा आणि अमावस्येला खूप मोठे सांस्कृतिक स्थान लाभलेलेे आहे. यामध्ये भरटी- ओहोटी, दाबाचे पट्टे, पौर्णिमेला चंद्रग्रहण - अमावस्येला सूर्यग्रहण, नौसर्गिक चक्रात बदल या घटना पाहायला मिळतात. म्हणूनच हिंदू सण संस्कृती यावर अवलंबून असावेत.             आज बुधवार दिनांक ३१ जानेवारी २०१८. आज माघी पौर्णिमा म्हणजेच चुडी पौर्णिमा. आ...

ज्वलंत हुंदुत्वाचे तेज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे .....!!!!

Image
          १९२६ च्या सरत्या जानेवारीच्या म्हणजेच २३ तारखेचा सूर्य अगदी इंग्रजी राजसत्तेच्या जुलमाखालीही आनंदमय अश्या भगव्या किरणांनी चारी दिशा उजळवून टाकत तेजस्वी बाळाला जन्माला घालूनच उगवला!!!! पुढेही बाळ अशी हाक लाभलेला हा बालक हिंदुस्थान वाशीयांसाठी बाप म्हणूनच लाभला...... ब्रिटिशी सत्तेच्या जुलमाला पिचलेल्या आणि सामाजिक रूढी परंपरानी ग्रासलेल्या समाजाचे प्रबोधन करून त्यांना ऐकवटण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या प्रबोधनकार ठाकऱ्यांच्या घरात हिंदूंचा आधारस्तंभच आई भवानीच्या आशीर्वादाने जन्मला... नाव त्याचे बाळासाहेब ठाकरे!!!! बाळासाहेब ह्या नावाशिवाय महाराष्ट्र काय देशाचा ही इतिहास कदापि पूर्ण होऊ शकत नाही!!! मराठी माणसाला जागे केले            भारत स्वतंत्र झाला होता परंतु स्वतंत्र भारतात विभागलेला हिंदू मात्र अजून एकरूप झाला नव्हता..... जातीयवाद आणि दहशतवाद याच्या सावटाखाली जनता भयभीत झाली होती. विशेषतः वाघासारख्या मराठा माणसाचे जगणे हे शेळीपेक्षा भयानक झाले होते. समाजसुधारक आणि संतांची समृ...

किल्ले अजिंक्यतारा :- द्वारशिल्पे

Image
किल्ले अजिंक्यतारा वरील द्वारशिल्पांचा आढावा गडकिल्यावर प्रवेश करायचे असेल तर मुख्य प्रवेशद्वाराशिवाय पर्याय नसतो.... कारण चहूबाजूने गडाला भक्कम आशा तटबंदीने बंदीस्त केलेलं आढळते.....गडाचे प्रवेशद्वार आणि तटबंदी त्याच्या भक्कमतेची साक्ष देतात.... द्वार जितके भक्कम तितकाच गड ही भक्कम!!! म्हणूनच गडाची तटबंदी आणि द्वारे विशेष पद्धतीने बनवलेली दिसतात. ती बनविताना जो नाजूक भाग असतो त्यावर सहसा प्रहार होणार नाही किंवा तो लक्षात येणार नाही याची पुरेपुर दक्षता घेतलेली असते.... त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्या नवख्या व्यक्तीवर, शत्रूच्या वकीलावर किंवा इतरांवर विशेष छाप पडावी यासाठी द्वारावर काही शिल्पे कोरलेली आढळतात. त्यांना द्वारशिल्प असे संबोधतात. यातून आपल्याला अनेक गोष्टी कळू शकतात.            द्वारशिल्पं म्हणजे प्रवेशद्वारावर असणारे किल्ला बांधणाऱ्या, जिंकणाऱ्या राजसत्तेचे राजचिन्हे!!!  द्वारावर द्वारशिल्प म्हणून काही देवताही आढळून येतात. त्या प्रकोप दूर करणे किंवा भक्तीभावची निशाणी म्हणून आढळतात. कोणती राजवट गडावर राज्य करत होती हे ती...