Posts

१५२ वर्षानंतर घडणाऱ्या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार

Image
            मान्य करा अथवा करू नका परंतु मानवाला स्वतःच्या गरजा सोडून सतत नवं, अचंबनिय, थरारक, अद्भुत अस काही ना काही हवं असत. त्याच्याच शोधत तो रमलेला असतो. त्यालाच तो जीवन समजत असतो. कधी क्रोधीष्ट तर कधी प्रेमळ, कधी कुरूप तर कधी सुंदर, कधी लहानसा तर कधी आक्राळ विक्राळ असा भासणारा निसर्ग मानवाच्या मूलभूत गरजांसोबत इतर गरजा भागविण्यासाठी कटीबद्द असतो. बदल हा निसर्गाचा नियम आहे. कधी कोणता बदल होईल हे सांगता येत नाही. कधी कोणता कोणता चमत्कार होईल सांगता येत नाही. खगोलीय घटना हा निसर्गाचा जणू एक चमत्कारच...!!!! खगोलीय घटनांची रेलचेल असल्याने हिंदू संस्कृतीत पौर्णिमा आणि अमावस्येला खूप मोठे सांस्कृतिक स्थान लाभलेलेे आहे. यामध्ये भरटी- ओहोटी, दाबाचे पट्टे, पौर्णिमेला चंद्रग्रहण - अमावस्येला सूर्यग्रहण, नौसर्गिक चक्रात बदल या घटना पाहायला मिळतात. म्हणूनच हिंदू सण संस्कृती यावर अवलंबून असावेत.             आज बुधवार दिनांक ३१ जानेवारी २०१८. आज माघी पौर्णिमा म्हणजेच चुडी पौर्णिमा. आ...

ज्वलंत हुंदुत्वाचे तेज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे .....!!!!

Image
          १९२६ च्या सरत्या जानेवारीच्या म्हणजेच २३ तारखेचा सूर्य अगदी इंग्रजी राजसत्तेच्या जुलमाखालीही आनंदमय अश्या भगव्या किरणांनी चारी दिशा उजळवून टाकत तेजस्वी बाळाला जन्माला घालूनच उगवला!!!! पुढेही बाळ अशी हाक लाभलेला हा बालक हिंदुस्थान वाशीयांसाठी बाप म्हणूनच लाभला...... ब्रिटिशी सत्तेच्या जुलमाला पिचलेल्या आणि सामाजिक रूढी परंपरानी ग्रासलेल्या समाजाचे प्रबोधन करून त्यांना ऐकवटण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या प्रबोधनकार ठाकऱ्यांच्या घरात हिंदूंचा आधारस्तंभच आई भवानीच्या आशीर्वादाने जन्मला... नाव त्याचे बाळासाहेब ठाकरे!!!! बाळासाहेब ह्या नावाशिवाय महाराष्ट्र काय देशाचा ही इतिहास कदापि पूर्ण होऊ शकत नाही!!! मराठी माणसाला जागे केले            भारत स्वतंत्र झाला होता परंतु स्वतंत्र भारतात विभागलेला हिंदू मात्र अजून एकरूप झाला नव्हता..... जातीयवाद आणि दहशतवाद याच्या सावटाखाली जनता भयभीत झाली होती. विशेषतः वाघासारख्या मराठा माणसाचे जगणे हे शेळीपेक्षा भयानक झाले होते. समाजसुधारक आणि संतांची समृ...

किल्ले अजिंक्यतारा :- द्वारशिल्पे

Image
किल्ले अजिंक्यतारा वरील द्वारशिल्पांचा आढावा गडकिल्यावर प्रवेश करायचे असेल तर मुख्य प्रवेशद्वाराशिवाय पर्याय नसतो.... कारण चहूबाजूने गडाला भक्कम आशा तटबंदीने बंदीस्त केलेलं आढळते.....गडाचे प्रवेशद्वार आणि तटबंदी त्याच्या भक्कमतेची साक्ष देतात.... द्वार जितके भक्कम तितकाच गड ही भक्कम!!! म्हणूनच गडाची तटबंदी आणि द्वारे विशेष पद्धतीने बनवलेली दिसतात. ती बनविताना जो नाजूक भाग असतो त्यावर सहसा प्रहार होणार नाही किंवा तो लक्षात येणार नाही याची पुरेपुर दक्षता घेतलेली असते.... त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्या नवख्या व्यक्तीवर, शत्रूच्या वकीलावर किंवा इतरांवर विशेष छाप पडावी यासाठी द्वारावर काही शिल्पे कोरलेली आढळतात. त्यांना द्वारशिल्प असे संबोधतात. यातून आपल्याला अनेक गोष्टी कळू शकतात.            द्वारशिल्पं म्हणजे प्रवेशद्वारावर असणारे किल्ला बांधणाऱ्या, जिंकणाऱ्या राजसत्तेचे राजचिन्हे!!!  द्वारावर द्वारशिल्प म्हणून काही देवताही आढळून येतात. त्या प्रकोप दूर करणे किंवा भक्तीभावची निशाणी म्हणून आढळतात. कोणती राजवट गडावर राज्य करत होती हे ती...

ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा

Image
#२०१७_आवडते_पुस्तक #2017_best_book ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा           "इतिहासाला जो विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही" हे सत्यवचन आहे. इतिहास अनेक अनेक प्रकारे समजू शकतो. त्यासाठी अनंत साधने आहेत. कादंबरी, शोधग्रंथ, निबंधमाला ही जनमानसात रुजलेली आणि विस्तृतपणे इतिहास समजण्यास मदत करणारी साधने.          इतिहास अध्ययनाचे आणि वाचकांचे अनेक प्रकार असू शकतात. त्यापैकी इतिहास प्रेमी, इतिहास अभ्यासक आणि इतिहास संशोधक याप्रकारे एक वर्गवारी होऊ शकते.  इतिहासप्रेमी हे इतिहास वाचनासाठी कादंबरी, लेखमाला, काही प्रसिद्ध ग्रंथांचा आधार घेतात. इतिहास अभ्यासक हे बखरी, ग्रंथ, डायरी, पत्रे, शिलालेख, पुरातन नकाशे यांचा आधार घेतात. तर इतिहास संशोधक हे अपरिचित इतिहासाची उकल करण्यासाठी अनेक प्रकारचे संशोधन करून ग्रंथ लिहतात. सत्य जगासमोर मांडून इतिहासात भर घालतात.            सामान्य वाचक हे  घटनेतील कल्पकता आणि मनोरंजन यावर भर देतात. आणि त्यांना जर इतिहास ...

प्रतापगड दुर्ग संवर्धन

Image
दुर्ग संवर्धन            छावा प्रतिष्ठान जावली सोशिअल मीडिया समूहा तर्फे आम्ही 'प्रतापगड मोहीम एप्रिल २०१७', 'दुर्ग संवर्धन आणि स्वच्छता मोहीम' राबवली. आणि या वेळेस तेथे आम्हाला दुर्ग संवर्धनाचा एक भाग्यशाली मोका मिळालाच!               छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांच्या साथीने गनिमी काव्याचा वापर करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. गनिमी कावा म्हणजेच  संख्यबळाने कमी असलेल्या सैन्याच्या साथीने, तुलनेत मोठ्या असणाऱ्या गणिमास जेरीस आणने आणि त्याचा पराभव करणे. यात मुख्य डावपेच बेसावध शत्रूवर अचानक हल्ला करून त्याची जास्तीत जास्त हानी करून, शत्रू सावध होण्यापूर्वी माघार घेणे. असे अगणित हल्ले करून शत्रूचे मनोबल खच्ची करणे आणि त्यांच्या शस्त्रांचे  नुकसान आणि ताबा मिळवणे. त्याचबरोबर उंच आणि दुर्गम डोंगररांगाच्या सानिध्यात उंचावरती क दुर्ग बांधून चालून येणाऱ्या शत्रूवर दाट झाडांच्या सानिध्यातून हल्ले करणे, दगडफेक करणे. यासाठी महाराजांनी  महाराष्ट्रातील ...

उद्याच काय...??

Image
           उद्या दि १५ एप्रिल २०१७ वार शनिवार...उद्या "दुनियभरातील मीडियाला खूप मोठी बातमी भेटेल...!" बातम्या तर खूप साऱ्या भेटत असतील, पण त्या बातमी चा सुतोवाच जर सनकी तानाशहा किंग जोंग ऊन च्या उत्तरी कोरियन अधिकृत बातमी वाहिनीने केला असेल तर दुनियेच्या भल्या भल्या महासत्तांच्या काळजात धडकी भरणारच!         कारणही तसच आहे हा, हा अन्नाला मुकार झालेल्या जनतेवर अन्यायकारक निर्बंध घालणारा सनकी काय करेल ते सांगता येत नाही. आठवण ६एप्रिल२०१६ ची येतेय. जागतिक पातळीवर देशांची मीटिंग चालली होती. आणि दक्षिण कोरियाने ५.३ रिस्टर स्केल भूकंपाचे हादरे जाणवले. ते हादरे नैसर्गिक नव्हते ते होते कुरत्रिमं आणि त्याचे केंद्र होते उत्तर कोरियात..! ते हादरे होते सनकी हुकूमशाही राजवटीच्या 5 व्या सफलता पूर्ण अनुचाचणीचे..!            खर तर उत्तर कोरियाने झहीर केलं कि, ती हायड्रोजन बॉम्ब(H bomb) चाचणी होती. शक्यता नाकारू तर शकतच नाही कारण कि भूकंपचे हादरेच सर्व काही सांगून जात...

शिवनेरी ..... माझ्या नजरेतून

Image
       महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि राजमाता जिजाऊ यांच्या संस्कार नि धन्य झालेला गिरीदुर्ग म्हणजेच शिवनेरी. गडावरील देवी शिवाईच्या नावातून साकार झालेलं नाव आज तमाम हिंदुस्थानी लोकांच्या हृदयावर राज्य करतंय ते म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. अश्या या शिवनेरीच्या मातीचा मस्तकी टिळा लावायला मिळतो हि एक भाग्यपूर्ण गोष्ट...           छत्रपती ग्रुप तर्फे काढलेली पहिलीच मोहीम 'शिवनेरी मोहीम २०१७' भाग्यशाली इतिहासाच्या पाऊलखुणा जाणून घेण्याची एक सुवर्णसंधीच! मोहिमेला विविध ठिकाणाहून वरिष्ठ, विचारवंत, शिवभक्त, इतिहासकार याचेंबरोबर रविवार सुट्टीच्या दिवशी सुरवात झाली. आमची सुरवात पुणे येथून  सकाळी ७:३० वाजता सूर्यदेव दर्शनाच्या प्रथम भगव्या किरणाबरोबर झाली. संत ज्ञानोबामाउलींच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या भक्तिमध्ये न्हाऊन गेलेल्या आळंदी, देहू मार्गे आम्ही चाकण हुन थेट नारायणगाव मध्ये पोहचलो. नारायणगाव मध्ये पोहचल्यावर शिवनेरी गड जवळच असल्याची चाहूल...